बातम्या

महासंसदरत्न खासदार सौ.सुप्रिया ताई सुळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

Mahasandratna sportsperson Mrs Supriya Tai Sule developed various activities


By nisha patil - 6/30/2024 4:55:57 PM
Share This News:



राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष युवती जिल्हाध्यक्ष कु. सायली महाडिक यांच्या संकल्पनेतून महासंसदरत्न खासदार सौ.सुप्रिया ताई सुळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोल्हापूर यांच्या वतीने 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एकटी या सामाजिक संस्थेला भेट देऊन तेथील गरजू महिलांना मायेच्या डब्याचे वाटप करण्यात आले. 


 

यावेळी कोल्हापूर ते रायगड हे 350 किलोमीटर अंतर धावण्याचा विश्वविक्रम करणार्‍या आस्मा कुरणे हिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सायली महाडिक (राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष युवती जिल्हाध्यक्ष)


 

हेमा भाले(सदस्य सरकार प्रतिष्ठान), भक्ती हेगडे(अध्यक्षा सरकार प्रतिष्ठान), नंदिनी थोरात, आस्मा कुरणे, अंजली जाधव (जिल्हाध्यक्षा कोल्हापूर युवती काँग्रेस) आदी. मान्यवर उपस्थित होते.


महासंसदरत्न खासदार सौ.सुप्रिया ताई सुळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा