विशेष बातम्या

महावितरणचा वीजचोरांवर दणका – ७६ जणांवर कारवाई

Mahavidran crackdown on power thieves


By nisha patil - 2/13/2025 6:18:31 PM
Share This News:



महावितरणचा वीजचोरांवर दणका – ७६ जणांवर कारवाई

कोल्हापूर/सांगली, १३ फेब्रुवारी २०२५: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महावितरणने वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबवून ७६ वीजचोरांवर कारवाई केली. यामध्ये ६० ठिकाणी मीटरमध्ये फेरफार व हूकद्वारे वीजचोरी आढळली.

कोल्हापूरमध्ये ३७ जणांनी ३०,२१८ युनिट, तर सांगलीत ३९ जणांनी २४,७०५ युनिट वीज चोरी केल्याचे आढळले. पैकी १० ग्राहकांकडून १.११ लाख रुपयांची वसुली झाली असून उर्वरितांवर विद्युत कायद्याच्या कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई सुरू आहे.

महावितरणने नागरिकांना अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन केले असून वीजचोरीविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे.


महावितरणचा वीजचोरांवर दणका – ७६ जणांवर कारवाई
Total Views: 60