बातम्या
महाविकास आघाडीने २६ जुलैला दिली बंदची हाक
By nisha patil - 8/23/2024 3:02:39 PM
Share This News:
बदलापूरमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने २४ ऑगस्टला बंदची हाक दिली आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उद्याचा बंद हा राजकीय कारणसाठी नाही. उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी असणार आहे. सर्व महिला आणि पालकांना असं वाटतंय की आपली मुलगी शाळेत सुरक्षित राहिल का? अनेक मातांना वाटतंय, कामाच्या ठिकाणी गेल्यावर आपण सुरक्षित राहू का?
त्याच अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद आहे, असं ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, आजपर्यंत जे बंद झाले आहेत, तसच उद्याचा बंद राहिल. कडकडीत बंद असायला पाहिजे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णवाहिका सेवा, वृत्तपत्र, फायब्रिगेड चालू राहतील. सणासुदीचे दिवस आहे, दहीहंडी उत्सव आहे, या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर उद्याचा बंद दुपारी २ वाजेपर्यंत पाळावा. कारण अनेकांना उत्सव पण करायचे आहेत. या उत्सवात सुद्धा आपल्या मुली सुरक्षित राहतील की नाही. हा सुद्धा प्रश्न त्यांच्या मनात आहे. जर ही यंत्रणा वेळेत हलली असती, तर हा उद्रेक झाला नसता. हे आंदोलन राजकारण्यांनी प्रेरित आहे, हे उत्स्फुर्त नव्हतं. मग उच्च न्यायालयाने याची स्वत:हून दखल घेतली आहे
महाविकास आघाडीने २६ जुलैला दिली बंदची हाक
|