बातम्या
महाविकास आघाडीची पिछेहाट: विरोधी पक्षनेतेपदावर अनिश्चितता
By nisha patil - 10/12/2024 6:20:17 PM
Share This News:
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून, विरोधी बाकांवर फक्त ५० आमदार आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी २९ जागांची आवश्यकता असते, मात्र कोणत्याही पक्षाकडे ते संख्याबळ नाही. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियम व परंपरेनुसार योग्य निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. तसेच विरोधकांना विचार मांडण्यासाठी पूर्ण संधी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीची पिछेहाट: विरोधी पक्षनेतेपदावर अनिश्चितता
|