बातम्या

महावितरण कोल्हापूर परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदी मा.श्री.स्वप्निल काटकर रुजू

Mahavitaran of Kolhapur circle  Mr Swapnil Katkar will join as Chief Engineer


By nisha patil - 1/7/2024 9:54:31 PM
Share This News:



महावितरण कोल्हापूर परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदी पदोन्नतीने मा.श्री.स्वप्निल काटकर रुजू झाले आहेत. यापूर्वी ते रत्नागिरी मंडळात अधीक्षक अभियंता पदी कार्यरत होते. 

ते मूळचे सांगली जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. श्री.काटकर यांनी विद्युत अभियांत्रिकी शाखेत व विपणन व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण प्राप्त केले आहे. त्यांचा विद्युत क्षेत्रात विविध पदावर कामाचा २१ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. जून २००३ मध्ये तत्कालीन विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता या पदावर ते रुजू झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सांगली, कोल्हापूरात चाचणी विभागात व प्रकाशगड मुख्यालयात कामकाज केले आहे.


महावितरण कोल्हापूर परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदी मा.श्री.स्वप्निल काटकर रुजू