बातम्या
महिला आघाडीचे कार्य कौतुकास्पद: खा. धैर्यशील माने
By nisha patil - 1/27/2025 3:36:55 PM
Share This News:
महिला आघाडीचे कार्य कौतुकास्पद: खा. धैर्यशील माने
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना महिला आघाडीची बांधणी जोरात सुरू असून, तिचे कार्य कौतुकास्पद असल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. बुधवार, 22 जानेवारी रोजी रुईकर कॉलनी येथे झालेल्या कार्यक्रमात महिला आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सुधा चौगुले, पुनम खाडे, स्वाती भापकर, प्रियांका धुमाळ, सुजाता साळुंखे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. खासदार माने यांनी सर्वांना सक्षमपणे काम करण्याचे आवाहन केले.
महिला आघाडीचे कार्य कौतुकास्पद: खा. धैर्यशील माने
|