बातम्या
हातकलंगले तहसीलदार कार्यालय येथे मांग गारुडी समाजाचे जातीचा दाखल्याचे महा शिबिर संपन्न
By nisha patil - 12/2/2025 10:57:19 PM
Share This News:
हातकलंगले तहसीलदार कार्यालय येथे मांग गारुडी समाजाचे जातीचा दाखल्याचे महा शिबिर संपन्न
दिनांक 12 .2 .2025 हातकलंगले तहसीलदार माननीय सुशील कुमार बेलेकर यांच्या मार्गदर्शना खाली हातकलंगले तहसीलदार येथे मांग गारूडी समाजाचे जातीचा दाखल्या चे शिबिराचे उद्घाटन नायक तहसीलदार संदीप चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सर्व मांग गारूडी समाजाचे जातीचे दाखले करीता सर्वांनी आपले अर्ज दाखल करावे असे प्रतिपादन केले.
शिबिराचे आयोजन तहसीलदार सुशील कुमार बेलेकर यानी मांग गारूडी समाजाचे संस्थापक अध्यक्ष माननीय भारत चौगुले यांचा विनंती नुसार आयोजित करण्यात आले होते. यावेळी गेली 30 वर्षोंचा मांग गारुडी समाज्यातील जातिच्या प्रश्न अध्यक्ष भारत चौगुले यांनी सोडविल्या बद्दल मांग गारुडी समाज्याच्या वतीने अनिल लोंढे दिगंबर संकट बाबासाहेब चौगुले सुनील गायकवाड यांच्या हस्ते भव्य नागरिक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीचे अध्यक्ष.उत्तमराव कांबळे आबा हे होते. यावेळी सर्कल धुमाळ साहेब.पुजारी साहेब. सुर्यवंशी साहेब. व तलाठी खराडे मॅडम. गौरव खांडेकर. प्रशांत काळे.
आदी तलाठी उपस्थित होते. यावेळी स्वाभिमानी गुंठेवारी संघर्ष समितीचे कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष आशिष कोठावळे. मांग गरुडी समाजाचे समशेर चौगुले. राजेंद्र सकट.सुनील गायवाड. वस्ताद लोंढे.वासू काळे .उमेश काळे. संतोष देडे.अनिल लोंढे आदी पदाधिकारी नागरिक उपस्थित होते
हातकलंगले तहसीलदार कार्यालय येथे मांग गारुडी समाजाचे जातीचा दाखल्याचे महा शिबिर संपन्न
|