बातम्या

अखेर राजारामपुरी परिसरातील पिसाळलेला 'त्या' माकडाला पकडण्यात वन विभागाला यश

Manky mental


By nisha patil - 7/31/2024 9:39:02 PM
Share This News:



गेले दोन ते अडीच महिने कोल्हापूर शहरातील राजारामपुरी, कमला कॉलेज परिसरात एक माकड लहान मुले व नागरिकांवर  हल्ला करून जखमी करत होते, त्या माकडाने गेल्याच आठवड्यात राजारामपुरी मधील तवनाप्पा पाटणे हायस्कूल मधील एका विद्यार्थ्यावर हल्ला केलेला व्हिडिओ सगळीकडे वायरल झाला होता...

त्या अनुषंगाने  पुढील खबरदारी म्हणून वनविभागाने त्वरित  त्याला पकडण्याचा निर्णय घेतला त्यानुसार गेल्या दहा दिवसापासून वनविभागाचे वन्यजीव बचाव पथक त्या माकडावर सातत्याने लक्ष ठेवून होते  परंतु उंच असलेल्या इमारती व भरपूर प्रमाणात असलेल्या झाडांमुळे त्या माकडाला पकडण्यात वन विभागाला यश येत न्हवते... काल रात्री अखेर ते माकड एका मेडिकल मध्ये घुसून  नास धुस करत असल्याचे समजले.... तात्काळ वनविभागाचे वन्यजीव बचाव पथक तेथे दाखल झाले व त्यांनी कोल्हापूर जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भूलीचे इंजेक्शन देऊन त्या माकडाला बेशुद्ध करून सुरक्षित रित्या पकडले त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला व वन विभागाचे आभार मानले...

   हे संपूर्ण बचाव कार्य कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक मा जी गुरुप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक श्री कमलेश पाटील, वनपरिक्षेत्राधिकारी करवीर श्री रमेश कांबळे डॉ किरण उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथक वन विभाग कोल्हापूर, छत्रपती वाइल्ड लाईफ फाउंडेशन व सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट च्या सदस्यांनी या बचाव कार्यात  सहभाग घेतला


अखेर राजारामपुरी परिसरातील पिसाळलेला 'त्या' माकडाला पकडण्यात वन विभागाला यश