बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा नाशिकमध्ये झाली सांगता

Manoj Jarange Patils peace rally ends in Nashik


By nisha patil - 8/13/2024 7:15:59 PM
Share This News:



राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील  यांना तुम्ही 88 उमेदवार निवडणुकीत उभेच करा आणि 8 जागा निवडून आणून दाखवा, असे आव्हान दिले होते. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर शांतता रॅलीच्या सांगता सभेतून जोरदार टीकास्त्र डागले आहे. भुजबळ नाशिकला लागलेली साडेसाती आहे. येवल्याला लागलेला डाग पुसणारच असे त्यांनी म्हटले आहे. 
 

मनोज जरांगेंना म्हणा 8 जागा निवडून आणून दाखवा. तुझ्याच जिल्ह्यातील निवडून येतात का बघ आधी? देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष भुजबळ संपवतील. छगन भुजबळांनी शिवसेना, राष्ट्रवादी फोडली, आता भाजप फोडतील. माझ्या नादी लागू नको, असे म्हणत त्यांनी छगन भुजबळांवर जोरदार निशाणा साधला. 
पुढे म्हणाले की,  फडणवीस देखील वेडयासारखे वागत आहेत. तुमच्या येवल्याचे नाव यावेळेस पवित्र होणार आहे. येवल्याचा डाग पुसून टाकणार आहे. त्याचा मी कार्यक्रमच लावतो. जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाला त्रास देईल, त्याला आडवे केले. देवेंद्र फडणवीस सर्वांना पाणी पाजतात. त्यांना मी भेटलो काय करावे हे त्यांना आता कळत नाही.


मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा नाशिकमध्ये झाली सांगता