बातम्या
अश्लील व्हिडिओ प्रकरणी शाहूपुरी पोलिसात अनेकांची चौकशी...
By nisha patil - 6/24/2024 12:17:05 PM
Share This News:
प्रेमीयुगुलाचा अश्लील व्हिडीओ मोबाईलवर तसेच सोशल मीडियावर वायरल केल्या प्रकरनी शाहूपुरी पोलिसांनी अनेकांची चौकशी केली मात्र संशयित अजून सापडलेला नाही. शहरात काही तरुणांच्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ फिरत होता.
हा व्हिडीओ कोणी व्हायरल केला, त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान व्हिडिओ व्हायरल करणारा आसपासच्या परिसरातील आहे का याचीही पोलीस कसून चौकशी करत आहेत.रविवारी शाहूपुरी पोलिसांनी काही तरुणांना बोलावून कसून चौकशी केली.
एका संशयिताने माझा मोबाईल दीड वर्षांपूर्वी चोरीला गेला आहे. त्याचा डेटा रिकव्हर करून हा व्हिडीओ व्हायरल केल्याचे सांगितले. याप्रकरणी संबंधितांचा तत्काळ शोध घ्यावा, असे आदेश शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिले.
अश्लील व्हिडिओ प्रकरणी शाहूपुरी पोलिसात अनेकांची चौकशी...
|