बातम्या

मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद रंगला...

Maratha vs OBC debate raged


By nisha patil - 6/27/2024 3:45:19 PM
Share This News:



सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद रंगला आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे या शब्दाची मागणी केली होती. मात्र, या अद्यादेशानंतर ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.यादरम्यान आज वंचित बहुजन आघाडीनेही हा अद्यादेश रद्द करण्याची मागणी केली तसेच गेल्या वर्षभरात दिलेले कुणबी प्रमाणपत्रही मागे घेण्याची मागणी केली. यानंतर आता मराठा क्रांती मोर्चानेही सगे सोयरेचा आधीचा अध्यादेश रद्द करुन नवी मागणी केली आहे. ही मागणी नेमकी काय आहे? त्याबद्दल जाणून घेऊया….राज्य सरकारनं सगे-सोयऱ्यांचा अध्यादेश काढून मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य राज्य समनवयक संजय लाखे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यांनी आज जालन्यात पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. सगे आणि सोयऱ्यांचा अर्थ या अध्यादेशात घ्यायला हवा होता.कुणबी आणि मराठा विवाहाला सामाजिक मान्यता असली तरी कायदेशीर दृष्टया ते दोन्हीही वेगळे मुद्दे आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांनी सुचवल्याप्रमाणे राज्य सरकारनं आधीचा अध्यादेश रद्द करून सगे सोयरेचा नवा अध्यादेश काढावा अशी मागणी संजय लाखे पाटील यांच्याकडून यावेळी करण्यात आली.


मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद रंगला...