बातम्या
जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या मोर्चा
By nisha patil - 1/29/2025 5:55:38 PM
Share This News:
गाय दूध खरेदी दरातील कपात मागे घ्यावी व दूध अनुदान तत्काळ द्यावे या मागणीसाठी जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या वतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
कोल्हापूरात गाय दूध खरेदी दरातील कपात मागे घ्यावी, घोषित केलेले दूध अनुदान तत्काळ द्यावे, या मागणीसाठी जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या वतीने गुरुवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात दूध उत्पादक गायीसह सहभागी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके व अॅड. माणिक शिंदे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या मोर्चा
|