ताज्या बातम्या
प्राधिकरणातील समाविष्ट गावांच्या विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक.
By nisha patil - 2/18/2025 4:14:20 PM
Share This News:
प्राधिकरणातील समाविष्ट गावांच्या विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक.
४२ गावांचा चांगला ‘मास्टर प्लान’ तयार करण्याचे निर्देश...
कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या प्राधिकरणातील समाविष्ट गावांच्या विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामधील ४२ गावांचा चांगला ‘मास्टर प्लान’ तयार करण्याचे निर्देश ना.प्रकाश आबिटकरांनी दिले.
कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाने प्राधिकरणातील समाविष्ट ४२ गावांचा चांगला ‘मास्टर प्लान’ तयार करण्याचे निर्देश ना. प्रकाश आबिटकरांनी दिले. मास्टर प्लान तयार करीत असताना यासाठी अनुभवी व तांत्रिकदृष्ट्या सक्षम संस्थेची मदत घेवून चांगला आराखडा तयार करा. हे नियोजन करीत असताना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारत्मकता ठेवून आणि जबाबदारीने पुढील दोनशे वर्षांचा विचार करून एक व्हीजन डॉक्यूमेंट तयार करावे अशा सूचनाही ना. आबिटकरांनी दिल्या. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या चौकशीच्या अनुषंगाने अहवालातील दोषींवर कारवाई करा, कामे वेळेत पूर्ण करावीत अन्यथा कारवाई करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना बदला असे निर्देश यावेळी दिले.
प्राधिकरणातील समाविष्ट गावांच्या विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक.
|