बातम्या

'राज्य आरोग्य धोरण' सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक

Meeting with Health Department officials


By nisha patil - 1/31/2025 7:51:49 PM
Share This News:



राज्यात प्रथमच 'राज्य आरोग्य धोरण' सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मुंबईत बैठकीचे आयोजन केलं होतं. महाराष्ट्राचे स्वतंत्र “आरोग्य विषयक धोरण” बनविण्याचे निर्देश  ना. प्रकाश आबिटकरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिलेत. भविष्यात महाराष्ट्रात 'आरोग्य पर्यटन' ही संकल्पना रुजवण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

दिव्यांगाबाबत ना. प्रकाश आबिटकरांनी विशेष काळजी घेत दिव्यांग व्यक्तींना प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे त्यांना जवळच्या ठिकाणी, सुलभतेने दिव्यांग प्रमाणपत्रे मिळावीत, यासाठी ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर शिबीर आयोजित करून निकषानुसार तपासणी करून प्रमाणपत्रे वितरित करण्याबाबत सूचना दिल्या. दिव्यांगांना बोगस प्रमाणपत्रे देणारे व त्याद्वारे शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी बैठकीला सहसचिव विजय लहाने, अशोक अत्राम, उपसचिव शिवदास धुळे, दिपक केंद्रे यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


'राज्य आरोग्य धोरण' सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक
Total Views: 48