ग्रामीण
आ. अमल महाडिकांची प्रशासक के. मंजुलक्ष्मीं यांच्या समवेत बैठक
By nisha patil - 1/22/2025 5:20:19 PM
Share This News:
आ. अमल महाडिकांची प्रशासक के. मंजुलक्ष्मीं यांच्या समवेत बैठक
महापालिका मुख्य इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल : आ. अमल महाडिक
कोल्हापूरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या मार्गावरील उड्डाणपूल बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आलाय. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. महाडिकांनी महापालिकेत प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासोबत विविध विषयासंदर्भात बैठक घेतली.
कोल्हापूरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी तावडे हॉटेल ते शिवाजी पूल या मार्गावरील उड्डाणपूल बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आलाय. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, शहर वाहतूक शाखा आदी विभागांशी समन्वय ठेवून त्यादृष्टीने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आ. अमल महाडिक यांनी बोलताना दिलीय.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी देखील संयुक्त प्रयत्न केले जाणार आहेत. शहरातील रस्ते करण्यासाठी नगरोत्थान योजनेतून आणखी निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल. महापालिका मुख्य इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. महाडिकांनी महापालिकेत प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियता नेत्रदीप सरनोबत यांच्यासोबत विविध विषयासंदर्भात बैठक घेतली.
आ. अमल महाडिकांची प्रशासक के. मंजुलक्ष्मीं यांच्या समवेत बैठक
|