बातम्या
शिवनाकवाडीतील महाप्रसादातुन झालेल्या विषबाधा प्रकाराचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत बैठक
By nisha patil - 12/2/2025 4:25:22 PM
Share This News:
शिवनाकवाडीतील महाप्रसादातुन झालेल्या विषबाधा प्रकाराचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली.या बैठकीत अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी साथरोग नियंत्रण करणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी एसओपी तयार करून त्याची जिल्हाभर जबाबदारी निश्चित करावी अश्या सुचना ना.प्रकाश आबिटकरांनी दिल्या.
त्याचबरेबर साथरोग नियंत्रणाची जबाबदारी अधिकाऱ्यांची असून त्यांनी या कामात कुचराईपणा करू नये तसेच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी स्टॅन्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर (एसओपी) तयार करून त्याची जिल्हाभर अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस प्रांताधिकारी श्री.चौगले, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूध्द पिंपळे, शिरोळचे तहसिलदार, आरोग्य विभागाचे अधिकारी, अन्न औषध विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शिवनाकवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवनाकवाडीतील महाप्रसादातुन झालेल्या विषबाधा प्रकाराचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसमवेत बैठक
|