बातम्या

मौजे म्हारुळ येथे सरपंच सौ.अलका सरदार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण....

Mharul independent day


By nisha patil - 8/15/2024 9:26:07 PM
Share This News:



बहिरेश्वर प्रतिनिधी...   १५ आॅगस्ट २०२४ स्वतंत्र भारताचा ७८ वा स्वतंत्र दिवस म्हणून देशभर मोठ्या उत्साहात १५ आॅगस्ट दिवस साजरा करण्यात आला... करवीर तालुक्यातील मौजै म्हारुळ येथील ग्रामपंचायत प्रांगणात विद्यमान सरपंच सौ अलका सरदार पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करण्यात आले....


      वि मं म्हारुळ प्राथमिक शाळेत उपसरपंच राजाराम कुंभार यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
     ध्वजारोहन झालेनंतर दिवंगत माजी सरपंच श्रीमती शालाबाई गणपती गुरव यांचे नूकतेच निधन झाले त्यांना सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. .त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी सैनिक प्रकाश चौगले,शुभम चौगले,अरुण शिंदे डॉ.कवडे, डॉ युवराज मगदूम,धनश्री पाटील, ओंकार पाटील,लाईनमन अशोक तळेकर सुमित पाटील आदी मान्यवरांचा ग्रामपंचायत म्हारुळ यांचे वतीने सत्कार करण्यात आला...
     याप्रसंगी  मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.. विद्यार्थी विद्यार्थीनीनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्ती पर भाषणे व  समुहगीत गायन केले...

    यावेळी सदस्य सागर चौगले, सरदार पाटील,प्रकाश कांबळे,माजी सरपंच वंदना म्हाकवेकर,रूपाली चौगले, रेखा कुंभार ग्रामसेवक पी एस मेंगाणे, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रंगराव पाटील, दत्त दुध संस्थेचे सचिव सरदार पाटील,तसेच वि मं म्हारुळ शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक स्टाफ, अंगणवाडी सेविका मदतनीस,तरुण मंडळाचे अध्यक्ष व सदस्य ,सेवा संस्था ,दुध संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...


मौजे म्हारुळ येथे सरपंच सौ.अलका सरदार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण....