बातम्या
करंजफेण येथे परप्रांतीय मजुराचा नदीत बुडून मृत्यू
By nisha patil - 12/2/2025 6:21:48 PM
Share This News:
करंजफेण येथे परप्रांतीय मजुराचा नदीत बुडून मृत्यू
राधानगरी तालुक्यातील करंजफेन येथे परप्रांतीय ऊसतोड कामगार आले आहेत. सोमवारी काही मजूर तुरंबे येथे बाजारासाठी गेले होते. बाजार करून परतत असताना संध्याकाळी लवकर वस्तीच्या ठिकाणी जाण्यासाठी ते करंजफेन व तुरुंबे दरम्यानच्या नदीतून पोहत निघाले होते . मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण नदीत बुडाला. या दुर्घटनेत मध्य प्रदेश मधील नामपूर येथील राधे पटेल वय 45 असं बुडालेल्या इसमाचे नाव आहे.
मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाकडून मृतदेहाची शोध मोहीम सुरू होती. मात्र मृतदेह अद्यापही सापडला नव्हता. आज बुधवारी सकाळी पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू करण्यात आली. अखेर राधे पटेल यांचा मृतदेह शोधण्यास के डी आर एफ च्या पथकाला यश आले.
या मोहिमेमध्ये के डी आर एफ चे कृष्णात सोरटे,शैलेश हांडे , प्रथमेश येरुरकर, आदिनाथ कांबळे, अविनाश चरापले, महेश पाटील,रोहित जाधव प्रशांत सनदी यांनी सहभाग घेतला.
करंजफेण येथे परप्रांतीय मजुराचा नदीत बुडून मृत्यू
|