ताज्या बातम्या

कोल्हापुरात ‘मिलेट व फळ महोत्सव २०२५’

Millet and Fruit Festival 2025 in Kolhapur


By nisha patil - 2/25/2025 8:42:29 PM
Share This News:



कोल्हापुरात ‘मिलेट व फळ महोत्सव २०२५’

कोल्हापूर, : महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने १ ते ५ मार्च २०२५ या कालावधीत व्ही. टी. पाटील स्मृतीभवन, कोल्हापूर येथे मिलेट व फळ महोत्सव होणार आहे.

उद्घाटन १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते होणार असून, अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवात ४० स्टॉल्समध्ये ज्वारी, बाजरी, नाचणीसह विविध तृणधान्ये व प्रक्रिया उत्पादने थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता येणार आहेत. तसेच, महिलांसाठी पाककृती स्पर्धा, तज्ज्ञ मार्गदर्शन व खरेदीदार-विक्रेते संमेलन असे विविध उपक्रम होणार आहेत.

करवीरवासीयांनी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन कृषि पणन मंडळाने केले आहे.


कोल्हापुरात ‘मिलेट व फळ महोत्सव २०२५’
Total Views: 208