बातम्या

सेंट अँड्रयूज चर्च, कागल येथे ख्रिसमस निमित्त कार्यक्रमाला मंत्री मुश्रीफ यांची उपस्थिती"

Minister Mushrif Attends Christmas Program

By nisha patil - 12/25/2024 3:57:18 PM
Share This News:

सेंट अँड्रयूज चर्च, कागल येथे ख्रिसमस निमित्त कार्यक्रमाला मंत्री मुश्रीफ यांची उपस्थिती"

सेंट अँड्रयूज चर्च, सोमवार पेठ, कागल यांच्या वतीने ख्रिस्ती बांधवांनी आयोजित केलेल्या ख्रिसमस (नाताळ) निमित्त कार्यक्रमास उपस्थित राहून मंत्री मुश्रीफ यांनी शुभेच्छा दिल्या. प्रभू येशूने दिलेला दया, क्षमा, शांती हा संदेश नेहमीच आपल्याला प्रेरणा देत असतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ख्रिस्ती बांधवांच्या ज्या अपेक्षा व मागण्या असतील त्या पूर्ण करून देण्याचे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

कार्यक्रमास केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नवल बोते, माजी नगरसेवक सौरभ पाटील, सुरेश घोरपडे, शमवेल तिवडे, जोश जॉन, रोहित जॉन, संजय सोनुले, प्रकाश सोनुले, अमर दावणे, विजय सोनुले, शाहूल सोनुले, सुरेश दाभाडे, बबलू दाभाडे यांच्यासह मोठ्या संख्येने ख्रिस्ती बंधू भगिनी उपस्थित होते.

सेंट अँड्रयूज चर्च, कागल येथे ख्रिसमस निमित्त कार्यक्रमाला मंत्री मुश्रीफ यांची उपस्थिती"
Total Views: 29