बातम्या

एकाच व्यासपीठावर मोदी-पवार, 

Modi Pawar on the same platform


By nisha patil - 2/22/2025 12:50:52 PM
Share This News:



मोदींनी दाखवला मोठेपणा, 

मोदींनी पवारांसाठी स्वतःच ओतले पाणी

 एकाच व्यासपीठावर मोदी-पवार, 

सौजन्याची झलक चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना एकाच व्यासपीठावर पाहण्याची दुर्मिळ संधी सर्वांना मिळाली. विशेष म्हणजे, या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठेपणा दाखवत शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची दिली. एवढंच नाही, तर स्वतःच्या हाताने बाटलीमधील पाणी ग्लासात ओतून पवार यांना दिलं. या सौजन्यशील कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या शिष्टाचारपूर्ण वागणुकीने अनेकांचं मन जिंकलं आहे, आणि राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.


एकाच व्यासपीठावर मोदी-पवार, 
Total Views: 30