बातम्या
स्वतंत्र दिनी मोदींच वक्तव्य...
By nisha patil - 8/15/2024 6:40:05 PM
Share This News:
आज देशासाठी आयुष्य वेचणाऱ्या वीरपुत्रांचं स्मरण करण्याचा दिवस आहे. आपला देश त्यांच्याप्रती ऋणी आहे. अशा प्रत्येक महापुरुषाप्रती आम्ही श्रद्धा प्रकट करत आहोत.यावर्षी तसेच गेल्या अनेक वर्षांत नैसर्गिक संकटांमुळे आपल्या काळजीत भर पडली आहे. यामध्ये आपण अनेक लोकांना आणि कुटुंबांना तसेच संपत्तीला गमावलं आहे. राष्ट्राचं यामुळे नुकसान झालं आहे.मी या लोकांप्रती माझ्या भावना व्यक्त करतो आणि या संकटकाळात देश त्यांच्याबरोबर मदतीला आहे असा विश्वासही त्यांना देतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
तरुण असोत वा महिला किंवा आदिवासी, सर्वांनी गुलामीविरोधात लढा दिलाय. 1857 च्या आधीही स्वातंत्र्य संग्रामात अनेक आदिवासी क्षेत्रात लढा दिला होता याला इतिहास साक्षीदार आहे.त्यावेळच्या लोकसंख्येच्या हिशेबाने 40 कोटी लोकांनी एक स्वप्न आणि संकल्प घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता. जर 40 कोटी लोक गुलामगिरीच्या श्रृंखला तोडू शकतात तर 140 कोटी नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय प्रत्येक अडचणीवर मात करुन भारताला समृद्ध करू शकतात. आपण 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य पार करू शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांना गांभीर्यानं घेण्याची आणि दोषींमध्ये भय निर्माण होण्याची गरज आहे असं म्हटलं. "जेव्हा बलात्काराच्या घटना होतात तेव्हा त्या माध्यमांममध्ये चर्चेला येतात मात्र असं राक्षसी कृत्य करणाऱ्यांना शिक्षा होते तेव्हा त्याच्या बातम्या होत नाहीत."मोदी म्हणाले, “मला वाटतं अशी शिक्षा होणाऱ्यांच्या बातम्या व्हाव्यात, ही भीती गरजेची आहे.महिलांचं योगदान आणि नेतृत्व यात देश पुढे जात आहे. मात्र त्याबरोबर महिलांवरील अत्याचार हीसुद्धा काळजीची बाब आहे.”
“एकेकाळी कट्टरवादी देशात येऊन हल्ले करत असत, आता लष्कर सर्जिकल स्ट्राइक करतं आणि यामुळे देशातल्या तरुणांचा ऊर भरुन येतो. आज 140 कोटी नागरिक आत्मविश्वासाने परिपूर्ण असून देशात होत असलेल्या सुधारणांमुळे त्यांना बळ मिळत आहे. मजबूत नेतृत्व, अढळ संकल्प आणि लोकभागिदारीमुळे आपण अतुलनीय यशाचा रस्ता प्राप्त करत आहोत.”“दुर्देवाने आपल्या देशाला स्वातंत्र्यानंतर माय-बाप कल्चरला तोंड द्यावं लागलं, सरकारकडे मागत राहा, सरकारसमोर हात पसरत राहा अशी स्थिती होती,आम्ही सरकारचं हे मॉडेल बदललं, आज सरकार स्वतः लाभार्थ्यांपर्यंत जातं. आज सरकार स्वतः त्यांच्या घरापर्यंत गॅस, पाणी, वीज आणि आर्थिक मदत पोहोचवतं. स्वातंत्र्यानंतर अनेकवर्षं आपली स्थिती जैसे थे राहिली. आम्ही ती मानसिकता तोडली, मोठ्या सुधारणा आम्ही अंमलात आणल्या.” पंतप्रधान असे मोदी म्हणाले.
स्वतंत्र दिनी मोदींच वक्तव्य...
|