विशेष बातम्या
१२ वर्षीय मुलीवर विनयभंग प्रकरण: आरोपीला अटक, कठोर कारवाईची मागणी
By nisha patil - 3/21/2025 4:46:04 PM
Share This News:
१२ वर्षीय मुलीवर विनयभंग प्रकरण: आरोपीला अटक, कठोर कारवाईची मागणी
बालकांच्या सुरक्षेसाठी कठोर शिक्षा हवी – सकल हिंदू समाजाची मागणी
साळवण पोलीस स्टेशन अंतर्गत निवडे गावात १५ मार्च रोजी रात्री ८:३० वाजता अल्लाबक्ष मुल्ला (वय ६२) याने १२ वर्षीय मुलीवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीस अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने कठोर कारवाईची मागणी केलीय. समाजातील बालकांच्या सुरक्षेसाठी अशा घटनांना आळा बसावा याकरिता आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केलीय.
सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिनिधींनी साळवण पोलीस ठाण्याला भेट देऊन या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या प्रकरणात कोणत्याही प्रकारची तडजोड अथवा मिटवामिटवी होऊ नये. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. यावेळी गजानन तोडकर, उदय भोसले, अभिजीत पाटील, विकास जाधव, योगेश केळकर, प्रसन्न शिंदे, प्रशांत पाटील, अर्जुन आंबी, महेश पवार यांच्यासह स्थानिक गावकरी आणि सकल हिंदू समाजाचे अनेक सदस्य उपस्थित होते.
१२ वर्षीय मुलीवर विनयभंग प्रकरण: आरोपीला अटक, कठोर कारवाईची मागणी
|