बातम्या
मोटासायकल चोरट्यास अटक चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त
By nisha patil - 1/23/2025 6:16:42 PM
Share This News:
करवीर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील मोपेड घेऊन संशयित आरोपी धीरज शर्मा हा कळंबा तलाव ते गिरगाव गावाकडे जाणाऱ्या रोडवर येणार असल्याची गोपनीय माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पोलिसांनी कळंबा तलाव ते गिरगाव रोडवरील सदा दौलत पार्क परिसरात सापळा लावला. तेथून आरोपीला ताब्यात घेतले.तो घेऊन आलेल्या टीव्हीएस मोपेडच्या कागदपत्राबाबत विचारपूस केली असता ही मोपेड सहा ते सात महिन्यापूर्वी महाडा कॉलनी पाचगाव येथून एका घराचे दारातून चोरी केल्याचे त्याने सांगितले.
त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आलीय.त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केलाय.
मोटासायकल चोरट्यास अटक चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त
|