बातम्या
चौपदरीकरणासाठी आंदोलन यशस्वी..
By nisha patil - 9/24/2024 12:17:48 PM
Share This News:
कोल्हापूर: भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर विभागाने चौपदरीकरणाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे आंदोलनकर्त्यांना मोठे यश मिळाले असून, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवले जातील आणि चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती प्रकल्प संचालकांनी दिली आहे.
आंदोलनाच्या वेळी प्राधिकरणाचे अभियंता महेश पाटोळे यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. त्यांनी आंदोलन स्थळी हे पत्र सुपूर्द केले, ज्यामुळे आंदोलनकर्त्यांनी दिलासा घेतला. मात्र, चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
या यशस्वी आंदोलनाचे नेतृत्व माजी उपसरपंच अमितकुमार भोसले यांनी केले. या आंदोलनात भोकरे, रमेश कांबळे, भैया कांबळे, योगेश चोकाककर, मनोज कोळी, अमर आठवले, नदाफ चाचा, रमेश शिंदे, सुनील शिंदे, संजीव पाटील, प्रशांत शिंदे, राजेश पाटील, पिंटू किनिंगे, अमित दाशाल यांसारख्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाग घेतला. जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला.
रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम तातडीने हाती घेऊन, चौपदरीकरण लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत.
चौपदरीकरणासाठी आंदोलन यशस्वी..
|