बातम्या

सौ.अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गोकुळ शिरगाव "६८वा महापरिनिर्वाण दिन" उत्साहात साजरा.

Ms Ambubai Patil English Medium School


By nisha patil - 6/12/2024 10:01:36 PM
Share This News:



सौ.अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गोकुळ शिरगाव "६८वा महापरिनिर्वाण दिन" उत्साहात साजरा.

विद्यार्थ्यांना शाळेतील अभ्यासक्रमाबरोबरच महामानवांच्या जयंती व पुण्यतिथी यांची माहिती असावी व तसेच त्यांच्या जीवनातील संघर्ष माहीत असावा या निमित्ताने शाळेचे संस्थापक श्री.के.डी.पाटील सर यांनी सौ.अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गोकुळ शिरगाव या ठिकाणी  दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा केला.
 

 कार्यक्रमाची सुरुवात सौ. पूजा कांबळे मॅडम यांनी बुद्ध वंदनेने केली. विद्यार्थ्यांनी आपली भाषणे प्रस्तुत केली व शिक्षकांनी आपले विचार त्यांच्या भाषणातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे संस्थापक श्री.के.डी. पाटील सर यांनी भूषविले तसेच कार्यक्रमासाठी वाईस प्रिन्सिपल सौ.निर्मला केसरकर मॅडम,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस.के. पाटील मॅडम,सौ.नीलम जाधव मॅडम,सौ.सारिका बोराटे,श्री.संजय पाटील सर सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूजा कांबळे मॅडम यांनी केले. श्री.के.डी.पाटील सर यांनी महामानवांचे विचार फक्त वाचण्यासाठी नाहीत तर आपण त्यांची अंमलबजावणी आपल्या जीवनातही केली पाहिजे असे विचार व्यक्त केले.


सौ.अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गोकुळ शिरगाव "६८वा महापरिनिर्वाण दिन" उत्साहात साजरा.