बातम्या

महापालिका निवडणुकीचा पेच: कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

Municipal Election Embarrassment


By nisha patil - 1/29/2025 5:51:35 PM
Share This News:



महापालिका निवडणुकीचा पेच: कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीची उत्सुकता वाढली असताना, ती कधी होईल याबाबत अनिश्चितता कायम आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्षांनी निवडणुकीबाबत शंका उपस्थित केली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही निवडणुकीच्या संभाव्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

 सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची तारीख जानेवारीत दोन वेळा पुढे ढकलण्यात आली, त्यामुळे निवडणुका कधी आणि कशा होतील याची चर्चा रंगली आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रभागाच्या सीमेचा अंदाज घेत मतदारसंघांची बांधणी चार-पाच वेळा केली आहे. मात्र, निवडणूक लांबणीवर गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे.नवीन सरकार स्थापन झाल्यापासून शंका उपस्थित केली.


महापालिका निवडणुकीचा पेच: कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
Total Views: 35