विशेष बातम्या
ना. प्रकाश आबिटकर यांचा मेळघाट दौरा – आरोग्य सुविधांचा आढावा
By nisha patil - 3/25/2025 3:01:16 PM
Share This News:
ना. प्रकाश आबिटकर यांचा मेळघाट दौरा – आरोग्य सुविधांचा आढावा
ग्रामीण रुग्णालये आणि अंगणवाड्यांना भेट
हतरू व चुरणीतील आरोग्य केंद्रांची पाहणी
ना. प्रकाश आबिटकर यांनी मेळघाटातील अतिदुर्गम वाड्यांना भेट देऊन आरोग्य समस्यांचा आढावा घेतला. त्यांनी प्राथमिक व ग्रामीण आरोग्य केंद्रांची पाहणी करून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सूचना दिल्या.
हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांशी संवाद साधत औषध आणि प्रयोगशाळा सुविधांची तपासणी करण्यात आली. चुरणीतील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीगृह, शस्त्रक्रिया गृह, रक्तसाठा केंद्र आदींची पाहणी करून अधिक चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश दिले.
ना. प्रकाश आबिटकर यांचा मेळघाट दौरा – आरोग्य सुविधांचा आढावा
|