बातम्या
विवेकानंद कॉलेजच्या प्रा. नम्रता देविदास ढाळे यांना पी. एच. डी पदवी जाहीर
By nisha patil - 10/30/2024 7:40:13 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजच्या प्रा. नम्रता देविदास ढाळे यांना पी. एच. डी पदवी जाहीर
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर ( अधिकारप्रदत्त स्वायत) येथील प्राध्यापिका नम्रता देविदास ढाळे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून नुकतीच पी.एच. डी. पदवी जाहीर झाली. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रियांच्या बदलत्या प्रतिमेचा अभ्यास (१९३२
-१९८२) याबाबत विवेचन करणारा प्रबंध सादर केला. चित्रपटसृष्टीतील स्त्रियांच्या समस्या या बाबत आजची सेलिब्रेटी म्हणून झालेला बदल संशोधनात अभ्यासपूर्ण भर घालणारे हे योगदान असून त्यांनी प्रा. डॉ. कविता गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन कार्य पूर्ण केले.
या यशाबद्दल प्रा. नम्रता ढाळे यांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी मा प्राचार्या सौ शुभांगी गावडे, संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कौस्तुभ गावडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. आर. कुंभार, IQAC विभागाच्या प्रमुख डॉ.श्रुती जोशी, विवेकानंद कॉलेजमधील इतिहास विभाग प्रमुख डॉ. एस.आर.कट्टीमनी, रजिस्ट्रार श्री. आर.बी. जोग तसेच विवेकानंद कॉलेज मधील प्राध्यापक व सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
विवेकानंद कॉलेजच्या प्रा. नम्रता देविदास ढाळे यांना पी. एच. डी पदवी जाहीर
|