बातम्या
समरजितसिंह राजेंच्या विजयासाठी तालुक्यातील " नारी शक्ती" एकवटली -सौ.नवोदिता घाटगे
By nisha patil - 10/30/2024 7:23:31 PM
Share This News:
समरजितसिंह राजेंच्या विजयासाठी तालुक्यातील " नारी शक्ती" एकवटली -सौ.नवोदिता घाटगे
कागल / प्रतिनिधी कागल विधानसभा मतदारसंघात राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली बचत गटातील महिलांना कौशल्याअधारित विविध व्यवसायांसाठी प्रशिक्षण, त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ आणि तत्काळ अर्थिक मदत उपलब्ध करून देऊन या बचत गटांच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे सबलीकरणातून आत्मनिर्भर्तेकडे वाटचाल सुरू आहे. राजेंचा महिला सक्षमीकरणाचा हा प्रेरणादायी अजेंडा महिलांच्या लक्षात आल्यानेच राजे समरजितसिंह घाटगे यांच्या विजयासाठी तालुक्यातील " नारी शक्ती" एकवटली असल्याचे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी केले..
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ आज कापशी,नंद्याळ,बेनिक्रे येथील महिलांच्या परिवर्तन संकल्प दौऱ्याप्रसंगी आयोजित महिलांच्या सभेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या . यावेळी सौ.घाटगे यांचा प्रमुख महिलांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
सौ.घाटगे पुढे म्हणाल्या,तालुक्यातील महिला भगिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, सक्षम वैद्यकीय व्यवस्था,प्रथमोपचार,रुग्णवाहिका या सर्व बाबी दुर्लक्षित झालेल्या आहेत. राजेंच्या मार्गदर्शनाखाली गावागावातील महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून महिलांच्या हक्काच्या सोयी सुविधांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील माझ्या या महिला भगिनींच्या बाबतीतील हे विदारक चित्र बदलण्यासाठी आपल्या सर्वांच्या हक्काचे राजे समरजितसिंह घाटगे यांना निवडून देऊया असे आवाहनही त्यांनी केले.अनुराधा निवृत्ती कांबळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी राजश्री सूर्यवंशी,तेजस्विनी रणनवरे,रेश्मा शिवडकर, अनिता दुधाळे,राजश्रीताई पाटील,माधुरी गौड,सुरेखा पाटील,विद्या करडे, शुभांगी गौड यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या......
स्वागत प्रास्ताविक उमेश देसाई यांनी केले दिपाली दुधाळे यांनी आभार मानले..
एक कॉल..... प्रॉब्लेम सॉल......
यावेळी बोलताना सौ.अश्विनी मकरंद कोळी म्हणाल्या, राजे समरजितसिंह घाटगे यांच्याकडे कोणतीही सत्ता नसताना ते गोरगरीब,सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून येत आहेत. नवोदिता घाटगे वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली तर जिजाऊ समितीच्या वतीने आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून महिलांच्या विविध आजारांवर उपचार करून त्यांना निरोगी करण्याचे भाग्य त्यांना मिळाले आहे. त्यामुळे राजेसाहेब असोत किंवा वहिनी साहेब , त्यांना केवळ आम्हा महिलांच्या केवळ एकाच फोन काॅलवर आमचे ते प्रॉब्लेम सॉल करतात. याची परतफेड येत्या विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या महिला भगिनी राजेंना मतदानाच्या माध्यमातून नक्की करतील...
समरजितसिंह राजेंच्या विजयासाठी तालुक्यातील " नारी शक्ती" एकवटली -सौ.नवोदिता घाटगे
|