विशेष बातम्या
वेंगुर्ला येथे ‘नैसर्गिक सुगंधांवर राष्ट्रीय परिषद’ २१ व २२ मार्चला
By nisha patil - 6/3/2025 9:58:29 PM
Share This News:
वेंगुर्ला येथे ‘नैसर्गिक सुगंधांवर राष्ट्रीय परिषद’ २१ व २२ मार्चला
वेंगुर्ला, ६ मार्च २०२५: "नैसर्गिक सुगंधांचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सामाजिक फायदा आणि महिला सक्षमीकरणासाठी वापर" या विषयावर आधारित राष्ट्रीय परिषदेचे आयोजन २१ व २२ मार्च २०२५ रोजी वेंगुर्ला येथे होणार आहे. ही परिषद मधुसूदन कालेलकर सभागृह, वेंगुर्ला कॅम्प येथे पार पडणार आहे.
परिषदेमध्ये कोकणातील ‘सुरंगी’ या सुगंधी वनस्पतीच्या संवर्धनावर, तसेच स्थानिक अर्थार्जन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांवर चर्चा होणार आहे. भारतीय महिला वैज्ञानिक संघटना (इवक्षा), बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला, डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला, आणि वेंगुर्ला नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
परिषदेत वनस्पतीशास्त्र, अॅरोमा मिशन, पर्यावरण आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुनील लिमये (निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर), डॉ. विभा मल्होत्रा साहनी (अॅरोमा मिशन), डॉ. श्रीरंग यादव (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) उपस्थित राहणार आहेत.
तसेच, देशभरातील सुगंधी वनस्पती क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक आणि व्यावसायिक यात सहभागी होणार आहेत. परिषदेत सुगंधी वनस्पतींसोबत नैसर्गिक उत्पादनांवरील माहिती सत्रे, साबण आणि पुष्पपेय निर्मितीची प्रात्यक्षिके देखील होणार आहेत.
विद्यार्थी, संशोधक आणि उद्योजकांनी या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक मंडळाने केले आहे.
वेंगुर्ला येथे ‘नैसर्गिक सुगंधांवर राष्ट्रीय परिषद’ २१ व २२ मार्चला
|