विवेकानंद कॉलेजमध्ये 4-5 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय स्तरावरील विवेकानंद महोत्सव
कोल्हापूर: विवेकानंद कॉलेजच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांमध्ये सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी "विवेकानंद महोत्सव: शोध चैतन्याचा" या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. हा महोत्सव यावर्षी 4 व 5 फेब्रुवारी 2025 रोजी कॉलेजच्या प्रांगणात होणार आहे.
पहिल्या दिवशी (4 फेब्रुवारी) विविध स्पर्धा जसे की अभिवाचन, ॲड मॅड शो, आयडीयाथॉन, रील फ्लिक्स, डान्स मॅजिक आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धांसाठी एकूण 70,000 रुपयांची पारितोषिके विजेत्यांना दिली जातील. दुसऱ्या दिवशी (5 फेब्रुवारी) फनफेअर आणि "मिस्टर ॲण्ड मिस विवेकानंद" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून साई बिल्डर्सचे प्रकाश मेडशिंगे आणि प्राचार्य अभयकुमार साळुंखे उपस्थित राहणार आहेत.
प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार आणि समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी विद्यार्थ्यांना महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.