शैक्षणिक
डॉ. सुनील रायकर यांना ‘आयएसटीई’चा राष्ट्रीय उत्कृष्ट संशोधक पुरस्कार
By nisha patil - 2/20/2025 6:26:13 PM
Share This News:
डॉ. सुनील रायकर यांना ‘आयएसटीई’ उत्कृष्ट संशोधक पुरस्कार
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सुनील रायकर यांना इंडीयन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई), नवी दिल्लीच्या राष्ट्रीय उत्कृष्ट संशोधक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंजाबमधील लॅमरिन टेक स्किल युनिव्हर्सिटी, रोपड येथे झालेल्या समारंभात एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सीतारामन आणि आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. प्रताप के. देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
3D प्रिंटिंग आणि फ्युझ्ड डिपोझिशन मॉडेलिंग (FDM) क्षेत्रातील संशोधन, युरोपियन वैज्ञानिक परिषदेतील योगदान, पेटंट्स आणि आंतरराष्ट्रीय परिषदांतील सहभाग यामुळे त्यांना हा सन्मान मिळाला.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. रायकर यांचे अभिनंदन केले असून, हा पुरस्कार महाविद्यालयाचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सुनील रायकर यांना ‘आयएसटीई’चा राष्ट्रीय उत्कृष्ट संशोधक पुरस्कार
|