बातम्या
नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
By nisha patil - 7/30/2024 5:56:17 PM
Share This News:
नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
मुंबई उच्च न्यायालयाने केला वैद्यकीय जामीन मंजूर
नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयातील नवाब मलिकांच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं नवाब मलिकांना वैद्यकीय कारणांसाठी तात्पुरता जामीन दिला होता. त्यावेळी मलिकांनी जामीन अर्जात आपल्याला किडनी, लिव्हर, हृदयाशी संबंधित अनेक शारीरिक व्याधी असल्याचं नमूद केलं होतं. आता याप्रकरणी नवाब मलिकांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून कायम करण्यात आला आहे.
दरम्यान, कुर्ला परिसरातील जमीन विक्रीच्या घोटाळ्यात नवाब मलिकांना ईडीनं अटक केली होती. दिर्घ कारावासानंतर नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता वैद्यकीय जामीन मंजूर करण्यात आला होता. सध्या वैद्यकीय उपचारांसाठी जामीनावर बाहेर आहेत.
नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
|