बातम्या

आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविकांसह महिला बचत गटांना पुरस्काराने सन्मानित करणार* *सो.नवोदिता घाटगे

Navodita ghatge


By nisha patil - 6/8/2024 2:27:48 PM
Share This News:



कागल,प्रतिनिधी. आरोग्य विषयक कार्यक्रमांची माहिती,आरोग्य सेवा व शासकिय योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्वपूर्ण दुवा म्हणून आशा स्वयंसेविका सेवाभावीवृत्तीने काम करतात.तर बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण,माता-बालकांचे आरोग्य, आहार, कुपोषण अशा विविध बाबींकडे लक्ष देण्याचे काम अंगणवाडीसेविका प्रामाणिकपणे करतात.त्यांना समाजात सन्मान प्राप्त करुन देण्यासाठी व अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका व महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या बचत गटांना सहकारातील आदर्श नेतृत्व शाहू साखर कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती देत अशा पुरस्कार प्राप्त व्यक्ती व बचत गटांच्या नावांची घोषणा राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा  सौ.नवोदिता घाटगे  यांनी केली.

शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा, राज्य साखर संघाच्या संचालिका व शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कागल,गडहिंग्लज, उत्तूर  विधानसभा मतदार संघात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या पुरस्कारांचे वितरण लवकरच समारंभपूर्वक करण्यात येईल. अशीही माहिती घाटगे यांनी दिली.स्व.घाटगे यांच्या ७६व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.

पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांची नावे अशी आहेत आशा स्वयंसेविका विभाग अनुराधा लोहार तमनाकवाडा, भारती पाटील हसुर खुर्द, सुजाता बैलकर हळदवडे, विमल कांबळे मांगनूर,चंद्रभागा बाटे बहिरेवाडी, सुमन कुंभार मडिलगे, आनंदी शिवणे आरदाळ, अनिता कांबळे सोनाळी, कविता साठे बोरवडे, मेघा पाटील बेलवळे बुद्रुक, अरुणा परीट केंबळी, सारिका जाधव होन्याळी, सरिता पाटील मळगे खुर्द, सुजाता खंडेराया सुळकुड, रूपाली घोरपडे करनूर,वैशाली पाटील खडकेवाडा-बेळुंकी, सोनाली उपलाने अवचितवाडी, भारती पाटील कडगाव, गीता चव्हाण बड्याचीवाडी, ज्योती पवार गडहिंग्लज,सुवर्णा खपले गडहिंग्लज,रूपाली भाईंगडे,अरुणा जाधव दोघीही उत्तूर .

अंगणवाडी सेविका विभाग

भारती कुणकेकर मुगळी, मंगलगिरी बुवा करंजीवणे, कल्पना चावरे हसूर खुर्द, सुगंधा बेलवाडकर माध्याळ, शुभांगी भेवरे वांजाळेवाडी, वंदना आत्याळकर बहिरेवाडी, मीनाक्षी उंचावळे होन्याळी,आंबुताई हसबे मडिलगे, विजया माने मडिलगे, मंगल डोंगरे मडिलगे,साऊबाई बचाटे सोनळी, नंदा पोवार बिद्री, संगीता पाटील बोरवडे, मोनिका डिसुझा बाचणी,जयश्री पाटील केंबळी, सुवर्णा मोरे शेंडूर, शोभाताई कांबळे आणुर, गीतांजली यादव बानगे, संजीवनी गुरव पिंपळगाव बुद्रुक, अनुजा हेगडे सुळकुड, अंजना आकुर्डे पिंपळगाव खुर्द,संगीता पाटील गलगले, धनश्री पोवार सुरूपली, प्रतिभा लोंढे चिमगाव, सुनीता पाटील करंबळी, सुनीता पाटील कडगाव ,मिरा मुळे गिजवणे, रूपाली अर्दाळकर कौलगे, धोंडूताई देसाई ऐनापुर, भाग्यश्री जाधव, अश्विनी चौगुले, सुनिता जकाते, रंजना भाट सुजाता चौगुले दोघीही मुरगुड, साधना पाकले वंदना देवरु दोघीही उत्तूर

महिला बचत गट विभाग

ज्योतिर्लिंग कापशी,घे भरारी बोळावी, ब्रम्हा विष्णू महेश उत्तुर,जिजाऊ, महिमा सोनाळी, महालक्ष्मी निढोरी,सम्राट अशोक सावडे बुद्रुक, सखी ग्रामसंघ सावडे बुद्रुक, भावेश्वरी गोरंबे, राधाकृष्ण बामणी, कामधेनू बानगे, अहिल्यादेवी मौजे सांगाव, सावित्रीबाई फुले लिंगनूर दुमाला, प्रतिभा पिंपळगाव खुर्द, महालक्ष्मी खडकेवाडा- बेळूंकी, अंबाबाई शिंदेवाडी, पद्मावती कुरुकली, मैत्री  बेनिक्रे,राणीबाई बेकनाव,प्रेरणा गिजवणे, भरारी कडगाव, भिमाई कडगाव,गणेश कडगाव,विठ्ठल रुक्मिणी बड्याचीवाडी, शिव जिजाऊ कागल,जानकी कागल,महालक्ष्मी कागल,वृंदावन मुरगुड, राधाकृष्ण, सिद्धेश्वर, सारंग, गौरीनंदन, जय संतोषी, आदिशक्ती,गणराज सर्व गडहिंग्लज , श्रमिक, ब्रह्मा विष्णू महेश, सद्गुरु सर्व उत्तूर ,सप्तशृंगी  व माऊली बहिरेवाडी.


आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविकांसह महिला बचत गटांना पुरस्काराने सन्मानित करणार* *सो.नवोदिता घाटगे