शैक्षणिक

नवीन संकल्पनांचा वापर करून उद्योग उभारणी करणे गरजेचे – सुर्यकांत दोडभिसे, CEO, SIBIC, कोल्हापूर

Need to build industry using new concepts


By Administrator - 2/17/2025 4:45:30 PM
Share This News:



नवीन संकल्पनांचा वापर करून उद्योग उभारणी करणे गरजेचे – सुर्यकांत दोडभिसे, CEO, SIBIC, कोल्हापूर

कोल्हापूर: 17 – आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी युवा पिढीने नोकरी शोधण्याऐवजी नवीन उद्योग उभारण्याच्या नवनवीन संकल्पना वापरणे आवश्यक आहे, असे मत सुर्यकांत दोडभिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, SIBIC, कोल्हापूर यांनी व्यक्त केले.

"शासन Start up India, Venture Capital, India Seed Fund Scheme यासारख्या योजना नवीन उद्योगांना बळ देत आहेत. या माध्यमातून देशातील युवा उद्योजकांना पाठिंबा दिला जात आहे," असे ते म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांची Creativity Test घेऊन त्यांच्या गुणवत्तेची चाचणी देखील करण्यात आली. कोल्हापूरमधील SIBIC या संस्थेच्या माध्यमातून नवीन स्टार्टअप्सना मार्गदर्शन केले जाते, असे ते पुढे म्हणाले.

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली IQAC व कॉमर्स विभाग, उद्योजकता विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. ए.एल. मोहिते यांनी केले, तर आभार डॉ. राजश्री पाटील यांनी मानले. यावेळी गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख डॉ. श्रुती जोशी, प्रा. सनी काळे, प्रा. आर.आर. माने, प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नवीन संकल्पनांचा वापर करून उद्योग उभारणी करणे गरजेचे – सुर्यकांत दोडभिसे, CEO, SIBIC, कोल्हापूर
Total Views: 96