बातम्या
5 वी व 8 वी साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी प्रवेशासाठी 1 जुलैपर्यंत मुदतवाढ
By nisha patil - 6/25/2024 2:38:34 PM
Share This News:
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वी साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्जासाठी दिनांक 1 जुलै 2024 (रात्री 11.59 वाजेपर्यंत) मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय, पुण्याच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे -
सोमवार, दिनांक 1 जुलै 2024 रोजी (रात्री 11.59 वाजेपर्यंत) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरणे. मंगळवार, दिनांक 5 जुलै 2024 रोजी विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करणे व सोमवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करणे याप्रमाणे आहे.
उपरोक्त तक्त्यात नमूद कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी व 8 वी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in हे संकेतस्थळ पहावे. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याप्रमाणे अर्ज भरण्यास सुरुवात करावी, असेही पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
5 वी व 8 वी साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी प्रवेशासाठी 1 जुलैपर्यंत मुदतवाढ
|