बातम्या
प्रेम नाही, थेट कट! लग्नाआधीच नवरदेवाला संपवण्याचा डाव उधळला
By nisha patil - 3/4/2025 5:37:18 PM
Share This News:
प्रेम नाही, थेट कट! लग्नाआधीच नवरदेवाला संपवण्याचा डाव उधळला
साखरपुडा झाला, प्री-वेडिंग शूटही झालं, पण...
पुण्यातून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साखरपुडा आणि प्री-वेडिंग शूट झाल्यानंतरही नवरीला नवरदेव पसंत नव्हता. लग्न मोडण्यासाठी तिने थेट नवरदेवाच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी सुपारी देत त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिचा हा डाव फसला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे. मात्र, सुपारी देणारी नवरी सध्या फरार आहे. या घटनेने संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली असून, पोलिस तिचा शोध घेत आहेत. या धक्कादायक कटामागील नेमकं कारण काय होतं, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
प्रेम नाही, थेट कट! लग्नाआधीच नवरदेवाला संपवण्याचा डाव उधळला
|