पदार्थ

रोजच्या जेवणात साधं मीठ नाही, सैंधव मीठ वापरावे

No plain salt should be used in daily food


By nisha patil - 1/17/2025 6:48:40 AM
Share This News:



रोजच्या जेवणात साधं मीठ नाही, सैंधव मीठ वापरावे

१. सैंधव मीठामध्ये इलेक्र्टोलाइटसचे प्रमाण सामान्य मीठापेक्षा कमी असते. यामुळे हाडांचा ठिसूळपणा, सांधूदुखी या समस्या दूर राहण्यास मदत होते. शरीराला प्रमाणापेक्षा जास्त इलेक्ट्रोलाइटस मिळाले तर हाडांचे दुखणे त्रास देऊ शकते. त्यामुळे आहारात सैंधव  मीठाचा वापर करावा. 

२. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा व्यक्तींना नियमितपणे सैंधव मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. मीठामुळे रक्तदाबाची समस्या वाढते, मात्र मीठ पूर्ण बंद करणे शक्य नसल्याने आहारात साध्या मीठापेक्षा सैंधव मीठाचा वापर करणे केव्हाही चांगले.

३. गेल्या काही वर्षात हृदयरोग असणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. हृदयाच्या तक्रारी वाढल्या तर एकाएकी हृदयाचा झटका येऊन जीव गमावण्याची शक्यता असते. पण अशा व्यक्तींनी आहारात सैंधव मीठ खाल्ल्यास त्याची हृदयरोगाची समस्या दूर होण्यास मदत होते.
 


रोजच्या जेवणात साधं मीठ नाही, सैंधव मीठ वापरावे
Total Views: 49