शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजचा ‘ओॲसिस ॲग्रो इंडस्ट्रीज’ वरोवर सांमजस्य करार
By nisha patil - 3/18/2025 5:22:03 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजचा ‘ओॲसिस ॲग्रो इंडस्ट्रीज’ वरोवर सांमजस्य करार
कोल्हापूर दि. 18 : विवेकानंद महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र पदव्युत्तर विभागातर्फे शिरोळ जि. कोल्हापूर येथील ओऑसिस अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीबरोबर सांमजस्य करार केला आहे. राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त (Best Agripreneur Award २०२१ by Ministry of Agriculture and Farmers Welfare) ओऑसिस अॅग्रो इंडस्ट्री मध्ये पर्यावरणपूरक शेतीसाठी जैविक खतांची व किटकनाशकांची निर्मिती केली जाते. या कराराअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी संयुक्त संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण वर्ग, व्याख्याने आदि आयोजित केली जाणार आहेत.
यावेळी प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार. सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. टी. सी. गोपाले, पीजी समन्वयक प्रा.व्ही. व्ही. मिसाळ, डॉ. एस. डी. माळी, डॉ. के. के. भिसे, प्रा. एस. डी. गबाले, प्रा. एस. ए. पिसे, कु. एम. एम. नाडकर्णी, कु. एस. एस, शेख, प्राध्यापक वर्ग आदि उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजचा ‘ओॲसिस ॲग्रो इंडस्ट्रीज’ वरोवर सांमजस्य करार
|