बातम्या
ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने बांधली लग्नगाठ...
By nisha patil - 1/20/2025 8:02:56 PM
Share This News:
ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने बांधली लग्नगाठ...
भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने गुपचुप लग्नगाठ बांधलीय. त्यांनी सोनीपत येथील माजी टेनिसपटू हिमानी मोर हिच्याशी लग्नगाठ बांधलीय. त्याने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे काही फोटोही शेअर करून त्याची लग्नाची बातमी दिलीय.
भारताचा दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने लग्नगाठ बांधलीय. त्यांनी सोनीपत येथील माजी टेनिसपटू हिमानी मोर हिच्याशी लग्नगाठ बांधलीय. यावेळी सर्वच धक्का बसला, त्याने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे काही फोटोही शेअर करून त्याची लग्नाची बातमी दिलीय. २७ वर्षीय नीरजने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर लग्नाची घोषणा केलीय.
नीरजने लग्न समारंभातील फोटोंसह पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी माझ्या कुटुंबासह माझ्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू केलाय. आम्हाला या क्षणापर्यंत आणलेल्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल कृतज्ञ. प्रेमाने बांधील रहा, नेहमी आनंदी रहा. घरच्यांनी नीरजच्या लग्नाचा कार्यक्रम अतिशय गुप्त ठेवला होता, जिथे डेस्टिनेशन वेडिंगसाठी हिमाचल प्रदेशची निवड करण्यात आली होती. या लग्नात दोन्ही कुटुंबांसह ४० - ५० लोकच सहभागी झाले होते.
ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने बांधली लग्नगाठ...
|