बातम्या

ॐ" हा जप का करावा?, त्याचे रहस्य काय.....?

Om why should be chanted


By nisha patil - 12/9/2024 7:06:08 AM
Share This News:



मनावर नियंत्रण करुन शब्दाचे उच्चारण करण्याच्या क्रियेला आपण मंत्र म्हणतो.

मंत्राचा सर्वात जास्त प्रभाव आपल्या तन आणि मनावर पडतो.

मंत्र जप ही एक मानसिक क्रिया आहे.असे म्हटले जाते की जसे असेल मन तसे असेल तन!

जर आपण मानसिक रूपाने स्वस्थ्य असु तरच आपले शरीर ही स्वस्थ्य असते.

मन स्वस्थ ठेवण्यासाठी मंत्राचा जाप करणे फार आवश्यक आहे.

 ॐ हा तीन अक्षरानी बनलेला आहे. 
अ, उ आणि म ने निर्मित हा शब्द सर्व शक्तिमान आहे. जीवन जगण्याची शक्ति आणि संसार आव्हानाचा सामना करण्याचा अगम्य साहस देणारा ॐ ओम् उच्चारण करण्याने विभिन्न प्रकारच्या समस्या व व्याधिंचा नाश होतो.

सृष्टीच्या आरंभी एक ध्वनि झाला तो म्हणजे ॐ आणि पुर्ण ब्रह्माण्डात हा ध्वनी पसरला आणि याच ध्वनीव्दारे भगवान शिव, विष्णु आणि ब्रह्मा प्रकट झाले. म्हणून ॐ हा सर्व मंत्राचा बीज मंत्र आणि ध्वनि व शब्दाचा निर्माता म्हटले आहे.असे म्हटले जाते की ॐ च्या नियमित उच्चाराने आपल्या शरीरातील आत्मा जागृत होतो आणि सर्व रोग व तणावा पासून मुक्त होतो म्हणून आपले साधु संत सद्गुरु ॐ होण्यास सांगत असतात. तसेच अनेक वास्तू तज्ञ सांगतात की घरात ॐ चा उच्चार करत राहिल्यास घरातील वास्तु दोष नष्ट होतो. 

ॐ मंत्राला ब्रम्हांडाचे स्वरूप मानले आहे. असे मानले जाते की ॐ मध्ये त्रिदेवाचा वास आहे. म्हणून मंत्राच्या अगोदर ॐ चे उच्चारण केले जाते. जसे...
॥ ॐ नमो भगवते वासुदेव॥ 
किंवा
॥ॐ नमः शिवाय।

आध्यात्मिक दृष्टीने असे मानले जाते की ॐ चा जाप करत राहिले तर मन शांत आणि शुध्द होते आणि मानसिक शांति प्राप्त होते. ॐ मंत्राच्या जपाने मनुष्य ईश्वराच्या फार जवळ जातो.

*ॐ हेच ईश्वराचे खरे नाव आहे.
योग दर्शनात हे स्पष्ट आहे की हा ॐ शब्द तीन अक्षरानी मिळुन बनला आहे. 

-अ, उ, म. प्रत्येक अक्षर ईश्वराच्या वेगवेगळ्या नावाना आपल्यात सामावून घेतले आहे.जसे “अ” ने व्यापक, सर्वदेशीय, आणि उपासना करण्या योग्य आहे. “उ” ने बुद्धिमान, सूक्ष्म, सर्व चांगल्या तत्वाचे मूल आणि नियम करणारा आहे. 
“म” ने अनंत, अमर, ज्ञानवान, आणि पालन करणारा,हे फार सुक्ष्म उदाहरण दिले आहे.तसे बघितले तर ॐ प्रत्येक अक्षराने समजू शकतो वास्तवात अनंत ईश्वराचे अनगिणत नावे केवळ या ॐ शब्दातच येतात... 
१) बराच काळ ॐ चे उच्चारण केल्यास पूर्ण शरीर तनावरहित होते.

२) जर आपणास भिती वाटत असेल, घबराट होत असेल, अंग थरथरत असेल तेव्हा ॐ चे उच्चारण करीत राहिल्यास पटकन फरक पडतो. 

३) नित्य ॐ च्या उच्चाराने शरीरातील विषारी तत्वे नष्ट होतात, शरीर आरोग्यदायी बनते, स्वस्थ बनते.

४) यामुळे हृदय आणि रक्त प्रवाह संतुलित होतो. पाचन शक्ति सुधारते.

५) यामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो. 

६) थकव्या पासून वाचण्यासाठी हा फार चांगला उपाय आहे. 

७) झोप येत नसेल, अनिद्रेचा त्रास असेल तर ॐच्या उच्चाराणे जाते. रात्री झोपताना झोप येई पर्यत ॐ चा उच्चार करावा आपोआप न कळत झोप लागुन जाते.

८) काही विशेष प्राणायाम करताना ॐ चा उच्चार केल्यास फुफ्फुसा मध्ये बळ येते.
असे अनगिणत उपाय आहेत.

 ॐ उच्चारण हे आत्म्याचे संगीत आहे.

ॐ हे चिन्ह अद्भुत आहे.
हे संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतीक आहे.

ब्रह्म चा अर्थ विस्तार, पसारा, पारणे, ओंकार ध्वनीचे १०० पेक्षा अधिक दिले आहेत. अनादि आणि अनंत व निर्वाणाच्या अवस्थेचे प्रतीक आहे. हा प्रणव मंत्र आहे. हा मंत्राचा प्रारंभ आहे अंत नाही.हा ब्रह्मांडाचा अनाहत ध्वनि आहे. अनाहत अर्थात दोन गोष्टी एकमेकांना टकरणे दोन गोष्टी एकमेकांना टकरणे त्याचा जो ध्वनी होतो, तो हा अनावर ध्वनी नाही. पण संपूर्ण ब्रह्मांडात हा ध्वनी चालू आहे. 

तपस्वी आणि ध्यान करणारे जेव्हा ध्यानाच्या खोल अवस्थेत जातात तेव्हा त्यांना हा ॐ चा ध्वनी ऎकु येतो. हा ध्वनी या जगात सर्वत्र चालू आहे, फक्त आपली ऎकण्याची क्षमता पाहिजे. हा ध्वनी ध्यानात ऐकू येऊ लागता मन आणि आत्मा शांती अनुभवू लागतो.

साधारण मनुष्य हा ध्वनि ऎकू शकत नाही, पण जो कोणी नेहमी ॐ चे उच्चारण करत असेल त्याच्या आसपास सकारात्मक ऊर्जेचा विकास होऊ लागतो हा ध्वनी ऐकण्यासाठी पूर्णत: मौन आणि ध्यानात असणे महत्त्वाचे आहे.जो हा ध्वनि ऐकू लागतो त्याचे परमेश्वराशी नाते बनू लागते. 

उच्चारण विधि
सकाळी लवकर उठून पवित्र होऊन
ॐ ध्वनीचे उच्चारण करावे. उच्चारण करताना पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन, वज्रासनात बसून. याचे उच्चारण ५,७,१०,२१,१०८ वेळा करावे.


ॐ" हा जप का करावा?, त्याचे रहस्य काय.....?
Total Views: 24