बातम्या
18 फेब्रुवारीला पुन्हा एकदा वकिलांचा एल्गार
By nisha patil - 7/2/2025 1:06:06 PM
Share This News:
18 फेब्रुवारीला पुन्हा एकदा वकिलांचा एल्गार
कोल्हापुरात सहा जिल्ह्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावं ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.या मागणीसाठी वकिलांनी पुन्हा आंदोलनाची तयारी केलीय. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी न्यायसंकुलात बैठक घेण्यात आली.यावेळी आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
18 फेब्रुवारीला सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भव्य रॅली काढण्यात येणार आहे.यामध्ये साडेतीन हजार वकील, पक्षकार व विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी हजर राहणार आहेत. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे.अशी माहिती बारचे अध्यक्ष ॲड. सर्जेराव खोत यांनी बैठकीत दिली.
मंगळवार, दि. १८ रोजी सकाळी ११ वाजता सर्व वकील, लॉ कॉलेजचे विद्यार्थी, पक्ष, संघटनांचे पदाधिकारी जिल्हा न्यायालयाच्या दारात जमतील. त्यानंतर दुचाकींवरून खंडपीठाच्या घोषणा देत माहिती फलक घेऊन ही रॅली पोलीस अधीक्षक कार्यालय, पितळी गणपती, धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी पुतळा, स्टेशन रोड, दसरा चौक, लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, शिवाजी महाराज पुतळा, भाऊसिंगजी रोड, सीपीआर चौक, खानविलकर पंपापासून जिल्हाधिकारी कार्यालयात येईल. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले जाणार असल्याचं खोत यांनी सांगितलं .
या बैठकी प्रसंगी कोल्हापूर बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
18 फेब्रुवारीला पुन्हा एकदा वकिलांचा एल्गार
|