विशेष बातम्या

युवा सेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान दिनी अभिवादन..

On behalf of Yuva Sena


By nisha patil - 11/3/2025 11:21:17 PM
Share This News:



युवा सेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान दिनी अभिवादन..

 हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त आज युवा सेना कोल्हापूरच्या वतीने पापाची तिकटी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या अतुलनीय पराक्रमाच्या जोरावर वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी औरंगजेबाच्या नजरेला नजर मिळवत आपल्या पराक्रम आणि धाडसाची चुणूक दाखवून दिली होती, आपल्या उभ्या आयुष्यामध्ये एकही लढाई न हरता अत्यंत पराक्रम आणि धाडसाने मराठा साम्राज्याचा विस्तार करून मुघलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आणि आपल्या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारा अशा महापराक्रमी शंभूराजाला युवा सेनेच्या वतीने आज अभिवादन करण्यात येत असल्याचे युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी सांगितले.

 यावेळी किशोर घाटगे, प्रसाद चव्हाण, कुणाल शिंदे, ॲड. मंदार पाटील, पियुष चव्हाण, सौरभ कुलकर्णी, सौ.तेजस्विनी घाटगे,शैलेश साळोखे,आदर्श जाधव, महेश जाधव, विपुल भंडारे, रोहन शिंदे,मंगेश चितारे,मेघराज लुगारे, सिद्धेश देसाई, अभिषेक मंडलिक, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.


युवा सेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना बलिदान दिनी अभिवादन..
Total Views: 23