राजकीय

भारतीय जनता पार्टीच्या वतीने संविधान गौरव अभियान संपन्न

On behalf of the Bharatiya Janata Party


By nisha patil - 1/27/2025 9:37:01 PM
Share This News:



भारतीय जनता पार्टीच्या वतीने संविधान गौरव अभियान संपन्न

कोल्हापूर: भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने संविधान गौरव अभियान संपन्न झाले. यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद आमदार अमित गोरखे, आणि खा. धनंजय महाडिक उपस्थित होते. अभियानाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन आणि संविधान ग्रंथाचे वाचन करण्यात आले.

चंद्रकांत पाटील यांनी डॉ. आंबेडकरांच्या भारतीय संविधानाबाबतच्या योगदानावर मार्गदर्शन केले आणि मोदी व फडणवीस सरकारच्या बाबासाहेबांच्या सन्मानासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव केला. अमित गोरखे यांनी काँग्रेस सरकारच्या काळात बाबासाहेबांवर झालेल्या अन्यायावर भाष्य केले. खा. महाडिक यांनी संविधान समितीतील बाबासाहेबांच्या निवडीसाठी काँग्रेसने केलेले प्रयत्न आणि त्यावरील आपले विचार मांडले.

या कार्यक्रमात भाजप पदाधिकारी आणि संविधान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भारतीय जनता पार्टीच्या वतीने संविधान गौरव अभियान संपन्न
Total Views: 133