बातम्या

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन...

On the occasion of August Kranti Day


By nisha patil - 9/8/2024 8:21:59 PM
Share This News:



ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन...

डॉ. राहुल आवाडे यांची उपस्थिती...


ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आमदार प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी पुरवठा कार्यालयाच्या प्रांगणात असलेल्या स्मृती स्तंभास तसेच महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन देशभरात साजरा केला जातो.यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, चंद्रकांत इंगवले, संजय केंगार, शिवाजी माळी, किशोर पाटील, राजू माळी, रमेश पाटील, प्रदीप दरीबे, राजू पुजारी, अरुण निंबाळकर, नजमा शेख उपस्थित होते.


ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन...