बातम्या

शहरातील हॉस्पिटल मध्ये भेट देऊन डॉक्टर्स डे निमित्त शुभेच्छा देत व्यक्त केली डॉक्टरांप्रती कृतज्ञता..

On the occasion of Doctor's Day


By nisha patil - 1/7/2024 9:53:38 PM
Share This News:



आज महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर साहेबांच्या मार्गदर्शनाने युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार युवासेना कोल्हापूरच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त शहरांतील विविध हॉस्पिटल मध्ये जाऊन डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
 

रुग्णसेवेचे व्रत घेऊन अहोरात्र कार्यरत असणाऱ्या आणि रुग्णाला पुर्णपणे बर करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या डॉक्टरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर उपक्रमावेळी युवासेना शहर मंदार पाटील,पियुष चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र उपविभागीय सोशल मीडिया समन्वयक सौरभ कुलकर्णी,(युवती)शहरप्रमुख सौ. नम्रता भोसले,(युवती)शहरप्रमुख सौ. तेजस्विनी घाटगे,उपशहरप्रमुख वल्लरी वाले, उपशहरप्रमुख निवेदिता तोरस्कर,उपशहरप्रमुख आणि सोशल मीडिया शहर समन्व्यक रोहन शिंदे आदी उपस्थित होते.


शहरातील हॉस्पिटल मध्ये भेट देऊन डॉक्टर्स डे निमित्त शुभेच्छा देत व्यक्त केली डॉक्टरांप्रती कृतज्ञता..