बातम्या

गणोशोत्सवानिमित्त म्हारूळ येथील तरुण मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केले वृक्षारोपण...

On the occasion of Ganoshotsavam


By nisha patil - 9/9/2024 2:01:07 PM
Share This News:



गणोशोत्सवानिमित्त म्हारूळ येथील तरुण मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केले वृक्षारोपण...

मंडळाच्या 21 व्या वर्षपूर्ती निमित्त 221 वृक्षांचे रोपण...

बहिरेश्वर :  करवीर तालुक्यातील मौजे म्हारुळ येथील तरुण मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सवानिमित्त वृक्षारोपण केले... याकरिता  वीरभद्र देवस्थान, स्मशानभूमी व पठार डोंगर येथे वृक्षारोपण करण्यात आले...

श्री. शिवस्वराज्य तरुण मंडळ चावडी गल्ली म्हारुळ ता. करवीर या मंडळाचे  21 वे वर्ष पूर्ती चे औचित्य साधत हा उपक्रम पार पाडला...यानिमित्ताने विविध उपक्रमांचे मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांची सुरुवात आज वृक्षारोपणाने करण्यात आली.वीरभद्र देवस्थान, स्मशानभूमी, गावाशेजारील डोंगरावरती जांभूळ, मोहागणी, करंज, हिरडा, सीताफळ, सुपारी, कडुलिंब, वड, अर्जुन, चिंच, पेरू, लिंब, काजू, चाफा, अशोक अशा विविध झाडांची लागवड करण्यात आली.
  
या उपक्रमामध्ये मंडळाचे सदस्य माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य श्री सागर चौगले,माजी उपसरपंच श्री.अमर मगदुम,तसेच संदीप जाधव, अजित चौगले,शिवाजी कवडीक, सागर चौगले,अमर चौगले,सतीश मगदुम,भैरवनाथ मगदुम, युवराज गुरव, अर्जुन मगदूम, संदीप कोळी ,अजित मगदूम लहान व मोठ्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत म्हारुळचे सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


गणोशोत्सवानिमित्त म्हारूळ येथील तरुण मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केले वृक्षारोपण...