बातम्या
महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांची मंदिर परिसरात अलोट गर्दी....
By nisha patil - 2/26/2025 8:42:41 PM
Share This News:
महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांची मंदिर परिसरात अलोट गर्दी....
महाशिवरात्री निमित्त मंदिरात भक्तिमय वातावरण....
महाशिवरात्रीनिमित्त कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ महादेव मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. त्याचबरोबर आज उत्तरेश्वर पेठेतील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त पहाटे सहा वाजता अभिषेक घालण्यात आला त्यानंतर काकड आरती संपन्न झाली.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडी व प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर रावणेश्वर मंदिरात देखील भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंडप घालण्यात आला होता. भाविक लोकांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले. आज महाशिवरात्री निमित्ताने भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांची मंदिर परिसरात अलोट गर्दी....
|