बातम्या

साळींद्रीच्या शिकार प्रकरणी एकास अटक .

One arrested in Salindri hunting case


By nisha patil - 9/25/2024 8:19:43 PM
Share This News:



 गारगोटी  वन परिक्षेत्रात साळी द्रीची शिकार केल्याप्रकरणी भुदरगड तालुक्यातील निष्पन् येथील सनी विश्वास राऊळ या २४ वर्षीय तरुणाला वनविभागाने अटक केलीय . त्याला काल मंगळवारी न्यायालयात हजर केले असता २७ सप्टेंबर पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आज राधानगरी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिलीय. तर या प्रकरणात आणखी तीन जणांची नावे पुढे आली आहेत . 

या प्रकरणी अधिक माहिती अशी कि , गारगोटी वनपरिक्षेत्रा मध्ये २७ ऑगस्ट रोजी झालेल्या वन्यप्राणी शिकारीच्या अनुषंगाने  वनविभागाचा तपास सुरु होता . यादरम्यान संशयित आरोपी सनी राऊळ याच्या मोबाईल मध्ये साळींदर चा शिकार केलेला फोटो आढळून आला .याबाबत वनविभागाच्या पथकाने चौकशी केली असता त्याने १३ सप्टेंबर रोजी राधानगरी वन क्षेत्रात साळींदर ची शिकार केल्याची  कबुली दिली . तर यावेळी गुन्हा घडताना प्रदीप कृष्णा राऊळ , सचिन कृष्ण राऊळ दोघेही रा . निष्पण , आणि गणेश उर्फ संतोष बेलेकर रा. करडवाडी  हे आपल्यासोबत असल्याचं सांगितलं . त्यानुसार या तिघांनाही वनविभागाने ताब्यात घेतलंय . दरम्यान संशयित आरोपिला मंगळवारी सायंकाळी राधानगरी प्रथम वर्ग दंडाधिकारी  न्यायालयात हजर केले असता २७ सप्टेंबर पर्यंत वणकोठडी सुनावली आहे. 

या प्रकरणाचा पुढील तपास उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली,सहाय्यक वनसंरक्षक एन एस कांबळे,वनक्षेत्रपाल व्ही एन पाटील, वनपाल सरवदे एस बी भाट यांचेसह पथक करत आहे


साळींद्रीच्या शिकार प्रकरणी एकास अटक .